कारागृहातील ‘पैठणी’ साडीचा दर बाजारभावापेक्षा कमी 

दिलीप कुऱ्हाडे 
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैदी बनवत असलेल्या ‘पैठणी’ला प्रतिक्षा यादी आहे. महिलांची सर्वांधिक पसंत असलेली ‘पैठणी’साडी कारागृहाच्या विक्री केंद्रात बाजारभावापेक्षा तीन ते चार हजार रूपयांनी कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चोवीस ‘पैठणी’ साड्या विक्री केल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली.

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैदी बनवत असलेल्या ‘पैठणी’ला प्रतिक्षा यादी आहे. महिलांची सर्वांधिक पसंत असलेली ‘पैठणी’साडी कारागृहाच्या विक्री केंद्रात बाजारभावापेक्षा तीन ते चार हजार रूपयांनी कमी आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चोवीस ‘पैठणी’ साड्या विक्री केल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी दिली.

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हातमागावर दोन कैदी ‘पैठणी’ साडी तयार करण्यात मग्न आहेत. या दोन कैद्यांना एक साडी तयार करण्यासाठी दोन महिने लागतात. ‘पैठणी’साठी रंग संगती, पॅटर्नचे मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रशिक्षक आहे. शहरातील कापड दुकानांमध्ये मिळणारी पैठणीची किंमत पंधरा ते सोळा हजार रुपये आहे. मात्र कारागृहातील पैठणीची किंमत दहा ते बारा हजार रुपये आहे. कारागृहाच्या विक्री केंद्रावर ‘पैठणी’ला मोठी मागणी आहे. त्यामुळे पैठणी खरेदी करण्याऱ्या महिलांची प्रतिक्षा यादी तयार केली आहे. 

या संदर्भात साठे म्हणाल्या, ‘‘ सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात दोन कैदी एकाच हातमागावर ‘पैठणी’ तयार करतात. त्यामुळे दोन महिन्याला एक पैठणी तयार होते. आता पर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींपासून मध्यवर्गीयांनी सुद्धा कारागृहातील पैठणी खरेदी केल्या आहेत. सुरवातीला मागणी प्रमाणे पैठणी तयार करीत होताे. मात्र आता मागणी वाढल्याने प्रतिक्षा यादी तयार करावी लागली आहे. ’’

कारागृह विभाग आणखी पाच हातमाग खरेदी करणार आहे. एका हातमागाची किंमती वीस ते पंचवीस हजार रुपये आहे. मात्र पैठणी तयार करण्यासाठी कुशलता हवी. त्यासाठी कैद्यांना पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक हातमाग महिला कारागृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर महिला कैदी सुद्धा ‘पैठणी’ साडी तयार करून शकतील. त्यामुळे महिन्याला सहा तर वर्षाला ७२ पैठणी साड्यांची निर्मिती होईल, असे साठे यांनी सांगितले. 

पैठणी बनविणाऱ्या कैद्याला प्रतिदिन ६५ रुपये पगार
कारागृहाच्या ब्रिद वाक्याप्रमाणे ‘ सुधारणा आणि पुनर्वसन’ अंतर्गत कैद्यांना अनेक उद्योगात गुंतवून ठेवले आहे. कारागृहाच्या नियमाप्रमाणे काम करणाऱ्या कैद्यांना प्रतिदिन ६५ रुपये पगार दिला जातो. पैठणी करणाऱ्या कैद्यांना सुद्धा रोज ६५ रूपये पगार दिला जातो. मात्र हेच कैदी बाहेर पडल्यानंतर चांगले पैसे मिळवून शकतात. त्यामुळे खऱ्या अर्थान त्यांची ‘सुधारणा व पुनर्वसन’ झाल्याचे समाधान असेल, असे स्वाती साठे यांनी सांगितले.

Web Title: prise of 'Paithani' sari made by prisoners is less than market price