esakal | येरवडयातील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर अटक
sakal

बोलून बातमी शोधा

jail

स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करुन बहाण्याने येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर शिरुर पोलिसांनी बेडया ठोकल्या.

येरवडयातील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 14 : स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करुन बहाण्याने येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला अखेर शिरुर पोलिसांनी बेडया ठोकल्या. रविवारी रात्री साडे आठ वाजता कैद्याने धूम ठोकली होती.त्याला शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिल विठ्ठल वेताळ (रा. गणेशनगर, डिग्रजवाडी फाटा, कोरेगाव भीमा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल अरुण जाधव (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळ यास चोरी केल्याच्या प्रकरणात शिरुर येथील न्यायालयाने २३ जूनला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला येरवड्यातील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात आले होते. 

हे वाचा - बारामतीकरांनो, लॉकडाउनमध्ये हे असणार सुरू, ही असतील बंधने

दरम्यान, रविवारी रात्री साडेआठ वाजता वेताळ याने कर्तव्यावरील पोलिसाला स्वच्छतागृहात् जायचे आहे, असे त्याने सांगितले. त्यानुसार कर्मचारी त्याला घेऊन बाथरुमपर्यंत गेला. त्यानंतर अनिलने बाथरुमच्या आतील दरवाजाची कडी तोडून गॅलरीतून पलायन केले होते. त्यानंतर तो शिरुर येथे गेला होता, त्याची खबर मिळताच पोलिसांनी अनिल अटक करुन येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.