esakal | फिल्मी स्टाईलमध्ये 'त्याने' केले येरवडा कारागृहातून पलायन
sakal

बोलून बातमी शोधा

jail.jpg

येरवडा कारागृहातुन कैद्याचे पलायन थांबत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रविवारी रात्री पुन्हा येरवडा येथील  तात्पुरत्या कारागृहातून एका कैद्याने पलायन केले.

फिल्मी स्टाईलमध्ये 'त्याने' केले येरवडा कारागृहातून पलायन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : येरवडा कारागृहातुन कैद्याचे पलायन थांबत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रविवारी रात्री पुन्हा येरवडा येथील  तात्पुरत्या कारागृहातून एका कैद्याने पलायन केले.

आणखी वाचा - पुण्याची सूत्रं हाती घेताच नव्या आयुक्तांनी काय केलं?

अनिल विठ्ठल वेताळ (रा.गणेशनगर, डिग्रजवाडी, कोरेगाव भीमा) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.याप्रकरणी कारागृह कर्मचारी विशाल जाधव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा येथील शासकीय विश्रामगृह  येथे तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. या कारागृहातुन कैदी पळ काढत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मागील महिन्यात देखील दोन कैद्यांनी शौचालयाच्या खिडकीचे गज उचकटून पळ काढला होता. तर त्याआधीही एका कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तात्पुरत्या कारागृहातून सतत कैदी पळून जात असल्याच्या घटना घडत असल्याची सद्यास्थिती आहे.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

पलायन केलेला कैदी अनिल विठ्ठल वेताळ याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला २३ जून रोजी येरवडा येथील तात्पुत्या कारागृहात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री नऊ वाजण्याचा दरम्यान त्याने स्वछागृहात जाण्याचा बहाणा केला.त्यामुळे सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याने त्याला स्वछागृहात घेऊन गेले.त्यानंतर स्वच्छतागृहाच्या आतील बाजूला असलेल्या दाराची कडी तोडून व्हरांड्यातून पळून गेला. बराच वेळ आवाज देऊन तो बाहेर न आल्याने पोलिसांनी पाहणी केली तेव्हा तो दिसून आला नाही. तसेच कैद्याने पलायन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image