

Prithviraj Chavan statement Missing Link
esakal
Missing Link Project : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरा झडत आहेत. राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाला आपला कधीही विरोध नव्हता. उलट या प्रकल्पाची संकल्पना आपल्या सरकारच्या काळातच पुढे आली होती. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अभ्यास आणि खर्चाचा फेरआढावा घेण्यासाठीच २०१३ मध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.