छत्रपती कारखान्याच्या कारभाराबाबत जाचक म्हणतात...                                                     

राजकुमार थोरात
Sunday, 6 September 2020

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ताशोरे ओढले.

वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ताशोरे ओढले असून, संचालक मंडळ व प्रशासनाने निकृष्ठ दर्जाची यंत्रसामुग्रीची खरेदी केली असून, कारखान्याच्या मालकीच्या चारचाकी गाडीचा गैरवापर हाेत आहे. संचालक मंडळाने जंबो नोकरी भरतीचा घाट घातला असून कारखान्यावर व सभासदावर बाेजा पडणार असल्याचा आरोप जाचक यांनी केला आहे.

 पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे ९ लाख मेट्रीक टन उसाचे क्षेत्र असून ३ लाख मेट्रीक टन गेटकेनचा उस उपलब्ध होईल असा अंदाज आहे. कारखान्याचा गळीत हंगामाची तयारी सुरु आहे. यासाठी संचालक मंडळ व प्रशासनाने यंत्रसामुग्रीसाठी लागणाऱ्या स्पेअरपार्टची खरेदी केली आहे.

जाचक यांनी कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ व प्रशासनाला लेख पत्र पाठवून खरेदीवर आक्षेप घेतला आहे.  उत्तम दर्जाच्या बेअरिंग खरेदी करण्याऐवजी बोगस  सप्लायर्स कडून निकृष्ठ दर्जाच्या बेअरिंग घेतल्या आहेत.तसेच कारखान्याच्या यंत्रसामुग्रीमध्ये बदल करण्यात येत असून यामुळे गाळप सुरु असताना एकाच वेळी दोन युनिटमध्ये अडचण येण्याची शक्यता असून खरेदीची चौकशी करावी.कारखान्याची तांत्रिक माहिती नसणाऱ्या संचालक मंडळाने सहकारातील तत्वे जपण्याचे आवाहन जाचक यांनी केले आहे.

चारचाकी गाडीचा गैरवापर...
छत्रपती कारखान्याच्या मालकीच्या चारचाकी गाडीचा गैरवापर करण्यात येत असून एका संचालकाने २ सप्टेंबर रोजी खासगी कामासाठी कारखान्याची गाडी मुंबईला नेली होती. तसेच खर्चासाठी दहा हजार रुपये कारखान्यातून घेतले आहेत.हा खर्च संचालकाकडून वसूल करण्यात यावा अन्यथा कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला वैयक्तिक व घरगुती कामासाठी कारखान्याची गाडी उपलब्ध करुन देवून वाटखर्चीसाठी १० हजार रुपये देण्याची मागणी जाचक यांनी केली लेखी पत्राद्वारे कारखान्याकडे केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जंबो नोकरी भरतीचा घाट...
कारखान्याच्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शंभर मुलांना नोकरीची पत्र देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.कारखान्याच्या आवश्‍यकतेनूसार साखर आयुक्तांची परवानगी घेवूनच आकृती बंधानूसार नाेकरी भरती करावी.संचालक मंडळाच्या सोईसाठी जंबो नोकरीभरतीचा बोजा कारखान्यावर व पर्यायाने सभासदावर टाकू नये. मुदत संपलेल्या संचालक मंडळाला सहकार कायद्यानूसार नोकरी भरती किंवा धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे जाचक लेखी पत्राद्वारे कारखान्याला कळविले आहे. 

यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Jachak criticizes the management of Shri Chhatrapati Sahakari Sugar Factory