

RBI Complaint Against Private Banks Over CSR Benefits and Crores in Deposits From Municipal Corporations and Zilla Parishads
sakal
पुणे : ‘‘जिल्हा परिषदा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मिळविण्यासाठी काही खासगी बँकांकडून ‘सीएसआर’ निधीचा प्रलोभनासारखा वापर होत आहे. या गैरप्रकाराची रिझर्व्ह बँकेने सखोल चौकशी करून संबंधित बँका आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी,’’ अशी तक्रार राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केली आहे.