esakal | पुण्यात खासगी बसने येणाऱ्यांबाबत मोठा निर्णय; आयुक्तांनी दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या आठवडाभरापासून एक हजार पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत.

खासगी बसने येणाऱ्यांचे आता होणार स्क्रिनींग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची (Corona) साथ कमी होत असली तरी खासगी बसने पुण्यात (Pune) येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याने यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खासगी बसमधून पुण्यात येणाऱ्या नागरिकांचे स्क्रिनिंग लवकरच सुरू केले जाईल, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या आठवडाभरापासून एक हजार पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण त्याच्या जवळपास दुप्पट आहे. शहरात सध्या ८ हजार ३०० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी संसर्ग वाढण्याचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच ठेवाव्या लागणार आहेत.

हेही वाचा: पुण्यात पीएमपीच्या बसमधून सुरु होणार कुरिअर आणि मालवाहतुक

राज्याबाहेरून पुण्यात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक आहे. पण राज्यातील नागरिकांसाठी याचे बंधन नाही. शहरात खासगी बसने मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करून येत आहेत, पण त्यांचे स्क्रिनिंग होत नाही. ने नागरिक पुण्यात आले की थेट रोजचे व्यवहार करतात. यामधील नागरिकांना कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असले तरी यातून संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

याबाबत आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘खासगी बसने पुण्यात येणाऱ्या नागरिकांचे सध्या स्क्रिनिंग केले जात नाही, त्यामुळे धोका आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी पुण्यात खासगी बसने येणाऱ्या नागरिकांचे स्क्रिनिंग सुरू केले जाईल.’’