‘आयटी’साठी खासगी बससेवेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी खासगी बससेवेत वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी दिली. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये ती सुरू होईल. 

आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सध्या ११५ बस उपलब्ध आहेत. नव्याने वाढवण्यात येणाऱ्या सेवेत २० वातानुकूलित बस असणार आहेत. आयटी पार्कमधील सहा हजार कर्मचारी याचा लाभ घेतात. नव्या बस सुरू झाल्यानंतर त्यामध्ये आणखी दोन हजार कर्मचारी वाढतील. पावसाळ्यात अनेक कर्मचारी बसला प्राधान्य देतात. 

हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशनने २०१४ मध्ये आयटी कर्मचाऱ्यांसाठी खासगी बस सेवा सुरू केली. हिंजवडीमधील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर असल्याने कर्मचारी स्वतःचे वाहन वापरण्याचे टाळतात. नवीन बसला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यात आणखी वाढ करण्याचा विचार आहे, असे भोगल यांनी सांगितले.

Web Title: private bus service increase for IT company

टॅग्स