

NEET Paper Leak Sparks Debate as Coaching Class Control Law Remains on Paper
sakal
पुणे: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे खासगी शिकवणी वर्ग आणि कोचिंग संस्थांचे धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा देशासमोर उघड झाले आहेत. असे असतानाच, महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या संगनमतावर लगाम घालण्यासाठी सरकारकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. खासगी शिकवणी वर्गाच्या नियमनासाठी स्वतंत्र अधिनियम आणण्याची घोषणा करून तब्बल वर्ष उलटले, तरीही शिक्षण विभागाची कार्यवाही कागदोपत्रीच आहे. त्यामुळे खासगी कोचिंग संस्थांसमोर सरकार हतबल झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.