पुणे जिल्ह्यात खासगी डाॅक्टर कोरोना उपचारार्थ ठेवलेत तैनात

सासवड (ता. पुरंदर) - येथील कोविड आढावा सभेत बोलताना जि. प. सीईओ आयुष प्रसाद., शेजारी उजवीकडून आ. संजय जगताप, खा. सुप्रिया सुळे, रणजित शिवतरे, प्रमोद काकडे आदी.
सासवड (ता. पुरंदर) - येथील कोविड आढावा सभेत बोलताना जि. प. सीईओ आयुष प्रसाद., शेजारी उजवीकडून आ. संजय जगताप, खा. सुप्रिया सुळे, रणजित शिवतरे, प्रमोद काकडे आदी.

सासवड - कोरोनाच्या संसर्गाचे संकट ओळखून संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुमारे 550 खासगी डाॅक्टर्स शासकीय यंत्रणेतील रुग्णांच्या उपचारार्थ तैनात ठेवले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून त्यासाठी तरतूद करुन ठेवली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य अभियान योजनेतून प्रत्येक गरजू रुग्णास उपचारार्थ खर्च मिळण्याचीही सोय केली आहे. त्यामुळे जनआरोग्य अभियानात सध्याची कमी रुग्णालयेच न ठेवता, नवीन रुग्णालयांचे प्रस्ताव त्वरेने द्यावेत. त्यास तत्काळ मान्यता देण्याचे सुतोवाच.. पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सासवड येथे केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या पुढाकारातून सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका पंचायत समितीच्या सभागृहात कोविड महामारीबाबत आढावा सभा झाली. त्यावेळी आयुष प्रसाद बोलत होते. यावेळी खा. सुळे, आमदार जगताप, श्री. प्रसाद आदींनी प्रांत प्रमोद गायकवाड, तालुका तहसिलदार रुपाली सरनौबत, गट विकास अधिकारी मिलींद टोणपे, सासवड पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, जेजुरीच्या पुनम कदम, डाॅ. उत्तमराव तापासे, डाॅ. भिसे, डाॅ. विवेक आबनावे आदींकडून आढावा घेतला. यावेळी जि.प.चे सभापती प्रमोद काकडे, रणजित शिवतरे, पुरंदरच्या सभापती निलीनी लोळे, विजय कोलते, सुदाम इंगळे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, प्रदिप पोमण, हेमंतकुमार माहूरकर आदी उपस्थित होते. होम क्वारंटाईनचे किंवा घरगुती विलगीकरणातील लोकांना शक्यतो कोविड सेंटरला न ठेवता इतर रुग्णांना जागा करुन द्या. ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सीजन सुविधा असेल तरच आरटीओ परवानगी मिळते. तशा ॲम्ब्युलन्स सुविधायुक्त नसतील तर कारवाई करा; अशीही सूचना आयुष यांनी केली. यावेळी वैद्यकीय मनुष्यबळ कमी असल्याबाबत दत्ता चव्हाण यांनी लक्ष वेधले. डाॅ. सुमित काकडे यांचा कोविडमधील कामगिरीबद्दल सत्कार खासदारांनी केला.

तीन व्हेंटीलेटर सेवेत दाखल..
कोविड आढावा सभेनंतर सासवडच्या कोविड हेल्थ सेंटरसमोर ॲक्युरेट कंपनीने दिलेल्या व टाटा कंपनीद्वारे दिलेल्या दोन व्हेंटीलेटर मशिनचे उद्गाटन यावेळी खा. सुळे, आ. जगताप, आयुष आदींनी केले. उद्या ते बसविणे व त्याचे कार्य लवकरच सुरु करण्याचे तेथील डाॅक्टरांनी स्पष्ट केले. 

कोविडसाठीच्या पुरंदर टिमचे सीईओकडून जाहीर कौतुक
पुरंदर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 550 पर्यंत आहे. तसेच `रॅपिड अँटिजेन टेस्ट`द्वारे कोरोना चाचणीचीही सासवडलाच सोय झाली, काही तासात रिपोर्ट मिळतात., असे तहसिलदार सरनौबत यांनी सांगितले. एकुणच आढावा घेतल्यानंतर आयुष प्रसाद यांनी पुरंदरच्या साऱया टिमच्या कामाचे जाहीरपणे कौतुक केले. तसेच अजून मनुष्यबळ देण्याचेही स्पष्ट केले. शिवाय तेवीस प्रकारच्या तपासणीचे मशिन सर्वात अगोदर पुरंदरला आणून वेगळे काम केल्याबद्दल आमदार जगताप यांचे जाहीर अभिनंदन केले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com