खासगी रुग्णालयांकडून बिलात दीड कोटीचा झोल

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचारापोटी जास्त रक्कम वसूल केल्याचा प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला आहे.
Covid Hospital
Covid HospitalSakal

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांनी (Covid Hospital) रुग्णांकडून (Patient) उपचारापोटी जास्त रक्कम (Amount) वसूल केल्याचा प्रकार लेखापरीक्षणातून उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ५० दिवसांतील ३ हजार ४५७ रुग्णांच्या बिलाची (Bill) तपासणी करण्यात आली. त्यात या रुग्णालयांनी १ कोटी ३४ लाख ४७ हजार ८४० रुपये अधिकची घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. (Private Hospital Bill Fraud in Pune District)

बिलातील जास्तीची रक्कम संबंधित रुग्णांना परत केली जाणार आहे. तसा आदेश संबंधित रुग्णालयांना देण्यात आला असून, प्रांताधिकारी आणि तहसीलदार याचा पाठपुरावा करत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Covid Hospital
पुण्यात पुन्हा तीन आकडी रुग्णसंख्या; रविवारी लसीकरण सुरु

जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने उपचाराच्या रकमेबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच बिलाची रक्कम निश्‍चित करून देण्यात आली आहे. तरीसुद्धा काही रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com