SSC HSC Exam : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी संधी

सध्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतो.
hsc exam
hsc examsakal
Updated on

पुणे - सध्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यात येतो. परंतु अनेक विद्यार्थी पात्र असूनही दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज भरू न शकल्याने त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते.

अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून यावर्षी प्रथम जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्याकरिता नावनोंदणीची संधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

राज्य मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांनी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. याबाबत मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या ‘http:/www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले.

जुलै-ऑगस्ट परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्जाची प्रक्रिया येत्या मंगळवारपासून (ता.१५) सुरू होणार आहे. खासगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाइन भरून अर्जाची प्रत, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी १५ मे पर्यंत मुदत दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येईल.

तसेच, पत्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असेही कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com