काँग्रेससोबत सूर जुळण्यात 'या' गांधींचा मोठा वाटा: संजय राऊत

ज्ञानेश सावंत
शनिवार, 21 डिसेंबर 2019

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सोनिया यांच्यात बोलणी सुरू असताना प्रियंका यांनीही मध्यस्थी केली. ज्यामुळे नवे स्थापनेला वेग आला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वयासाठी प्रियांका यांचे सहकार्य होते. सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष ताकदवान आहेत.

पुणे : महाराष्ट्रातील सत्तेपासून भारतीय जनता पक्षाला लांब ठेवण्याच्या मोहिमेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून नव्या सरकारचे गणित मांडताना प्रियांका यांनी बरीच जुळवाजुळव केल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा प्रवास उलगडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपाठोपाठ शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे सोनिया यांच्या संपर्कात होते, असेही राऊत यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात आलेल्या खासदार राऊत यांनी 'सकाळ' कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा, भाजपला बाजूला सारून नवे सरकार स्थापण्याच्या हालचाली, त्यातील चर्चेच्या फेऱ्या, शिवसेनेची भूमिका, आणि महाविकास आघाडीच्या सरकारचे भवितव्य आणि अजेंड आदी मुद्दयांवर राऊत यांनी मोकळेपणाने मते मांडली. त्याचवेळी नव्या सरकार कोणी पडणार नाही, ते कोणी पाडूही शकत नसल्याचे सांगत राज्यात स्थिर सरकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांवर माझा विश्वास, त्यांच्याकडे रिमोट नाही : संजय राऊत

शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील चर्चेचा मार्ग काय होता ? या प्रश्‍नावर राऊत म्हणाले, "शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सोनिया यांच्यात बोलणी सुरू असताना प्रियंका यांनीही मध्यस्थी केली. ज्यामुळे नवे स्थापनेला वेग आला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वयासाठी प्रियांका यांचे सहकार्य होते. सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष ताकदवान आहेत. आमच्या सगळ्यांकडेच सत्तेचा "रिमोट' आहे, तो पाच वर्षे राहील. त्यामुळे हे सरकार पडूच शकत नाही. तसे काही धाडसही कोणी करणार नाही.''

आमची 40 दिवसांची मोहिम यशस्वी झाली : संजय राऊत

"लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलांटउडी घेतली. ज्यांनी दोन्ही कॉंग्रेसला मदत घेतली, ते आता कसे काय सरकार पडण्याची भाषा करीत आहेत. भाजपने पैशांचाच तमाशा मांडला होता, तो शिवसेनेने मोडीत काढला, '' अशा शब्दांत राऊत यांनी राज यांचे आरोप फेटाळून लावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Gandhi plays major role for alliance with Congress says Shivsena MP Sanjay Raut