‘कौशल्य’ दाखविणाऱ्यांवर कौतुकाची थाप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 February 2021

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला. 

पुणे - विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता बहरावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निबंध व संभाषण कौशल्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी झाला. 

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे संचालक पंढरी परब, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड, आंबेगाव, इंदापूर, बारामती, मावळ व सातारा जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांसह पालकही उपस्थित होते. 

सकाळ एनआयईच्या वतीने विविध विद्यार्थिप्रिय उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणे हा मुख्य हेतू आहे. शाळा बंद असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला व यश प्राप्त केले, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते. विद्यार्थ्यांनीही भविष्यात सकाळ आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे.
- मृणाल पवार, संचालिका, सकाळ माध्यम समूह

Fastag Update - खेड-शिवापूर टोल नाक्यावर दुपारनंतर गोंधळ

सकाळ माध्यम समूहाचे उपक्रम हे नेहमीच कौतुकास्पद असतात. विद्यार्थ्यांना एक प्रकारे मुक्त व्यासपीठ आहे. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यास मदतच मिळते. शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
- पंढरी परब, संचालक, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप.सोसायटी लिमिटेड 

Elections 2021: कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित निबंध व संभाषण कौशल्ये स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांचे अभिनंदन. शालेय जीवनात मिळालेली पारितोषिके भविष्यातील वाटचालीस प्रेरणा देत असतात. ग्राहकांच्या सदिच्छांमुळे सोसायटी रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून भविष्यातही ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न असेल. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच बचतीची सवय लावली पाहिजे.
- सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लिमिटेड पुणे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prize distribution of Essay and Conversation Skills Competition