

पुणे : ‘‘भोंदू अशोक खरातचा भांडाफोड झाल्यानंतर आता देशातील सर्वच बुवा-बाबांची सखोल चौकशी केली पाहिजे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी केले. तसेच ‘‘धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करावे,’’ असेही या वेळी ते म्हणाले.