बारामती तालुक्यातील अंगणवाड्यांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी

संतोष आटोळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : गेल्या अनेक वर्षापासुन मोडकळीस आलेल्या, मंदिरे, समाजमंदिरे, प्राथमिक शाळा येथे भरणाऱ्या अंगणावाड्यांना आता स्वतःच्या हक्काच्या इमारती उपलब्ध होणार आहेत. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास योजनेंर्तगत बारामती तालुक्यातील 16 अंगणवाडीच्या इमारतींच्या बांधकामांसाठी 96 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीतील मुलांना प्राथमिक शाळेमध्ये, झाडाखाली किंवा जिर्ण झालेल्या इमारतीमध्ये शिक्षणाचे प्राथमिक धेड गिरवावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषेदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातुन एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंर्तगत तालुक्यातील 16 अंगणवाड्याच्या नविन इमारतींसाठी प्रत्येकी 6 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहेत. यामुळे याभागातील अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यानुरुप बारामती एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या विस्तार अधिकारी पुनम मराठे यांनी दिलेल्या माहिती नुसार मंजुर झालेल्या अंगणवाडीचे नाव व गावची नावे खालील प्रमाणे - बुरुंगुलेवस्ती (निरावागज), मोडवे गावठाण (मोढवे), शेंडकरवस्ती (करंजेपुल), बिदालवस्ती (मळद), मोरगाव 2 ( मोरगाव), गावठाण (खराडेवाडी), गावठाण 1 (गुणवडी), गावठाण (जैनकवाडी), बांदलवाडी (गुणवडी), काटेवाडी 3 (काटेवाडी), आदोबाचीवाडी (पाहुणेवाडी), रामनगर (माळेगाव), मुरुम 2 (मुरुम), गावठाण (पानसरेवाडी), मेखळी गावठाण (मेखळी), लोखंडेवस्ती (शिरवली),

जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्ह्यात 91 अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी 5 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यामध्ये बारामती तालुक्यातील 16 अंगणवाड्यांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांचे सहकार्य मिळाले. तसेच आगामी काळामध्ये खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातुन प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सांगितले.

Web Title: problem of anganwadi building solved in baramati