Pune : सुखसागरनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला; नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stray dogs

पुणे : सुखसागरनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला; नागरिक त्रस्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कात्रज - सुखसागरनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण करण्यांसाठी नागरिकांनी अनेक ठिकाणी पाण्याच्या बॉटलममध्ये लाल पाणी भरुन त्या गेटवर बांधल्याचे पाहायला मिळते. मोकाट कुत्रे हे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणांवर भुंकत असून त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहेत. तसेच, ते कुठेही घाण करत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

मोकाट कुत्रे चावण्याच्याही घटनाही सुखसागरनरमध्ये घडल्या आहेत. कुत्र्यांच्या वावरामुळे सुखसागरनगर भाग १, सुखसागरनगर भाग २, साईनगर आणि गोकुळनगरच्या काही भागात हा त्रास मोठ्या प्रमाणांवर आहे. मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही त्रास होत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. काही जणांकडून कुत्रे पाळले जातात. परंतु त्यांना फिरविण्यासाठी बाहेर काढले असता ते कुठेही घाण करतात. त्यामुळे रस्त्यांवर घाण होऊन त्याची दुर्गंधी सुटते. यात कुत्र्यांचे मालक सर्सास दुर्लक्ष करत असल्याचे सुखसागरनगरमधील रहिवाशी माधुरी ठोंबरे यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिकेकडे सातत्याने तक्रार करुनही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

हेही वाचा: Pune : कडबाकुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

पाळीव कुत्र्यांचाही त्रास मोठ्या प्रमाणांत वाढला आहे. कुत्र्यांच्या मालकांसाठी कडक नियम असायला हवेत. तसेच त्यांच्या पार्किंगमध्ये त्यांनी कुत्र्यांसाठी टॉयलेट बांधणे बंधनकारक करायला हवे. अन्यथा कुत्रा पाळण्यावर बंदी घालण्यात यायला हवी. कुत्रा पाळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मालकाची आहे. - सुनिता देशमुख, स्थानिक नागरिक

कुत्र्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे शक्य होत नाही. आपण फक्त त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करु शकतो. तसेच पाळीव कुत्र्यांबाबत सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास आरोग्य निरिक्षक कारवाई करतात. मात्र, असे आढळून आल्यास आणखी कडक कारवाई करतण्यात येईल.

- डॉ. दिनेश बेंडे, वैद्यकीय अधिकारी, परिमंडळ ४

loading image
go to top