Pune : कडबा कुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : कडबाकुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

Pune : कडबाकुट्टीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

पारगाव : लाखणगाव ता. आंबेगाव येथे कडबाकुट्टी मशीनवर जनावरांना कुट्टी करत असताना सोनाली अजय दौंड ( वय २१ वर्ष ) या विवाहितेचा कडबाकुट्टी मशिनमध्ये गळ्यातील ओढणी व केस अडकून गळ्याला गळफास लागुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा: '24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, येथील गव्हाळीमळा येथे काल मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोनाली अजय दौंड या जनावरांना कडबाकुट्टी मशीनवर चाऱ्याची कुट्टी करत असताना त्यांच्या गळ्यातील कापडी ओढणी कडबाकुट्टी मशिनचा पट्टा व पात्यामध्ये अडकून ओढली जाऊन डोक्याचे केस सुध्दा ओढले गेल्याने सोनाली दौंड यांच्या गळ्याला गळफास लागून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सोनाली यांचा सहा महिन्यापूर्वीच अजय दौंड यांच्याशी विवाह झाला होता माहेर कोकणातील चिपळूणचे आहे.

हेही वाचा: परमबीर सिंग फरार? न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

पती अजय हे वाहनचालक आहे ते काल वाहन घेऊन सुरत (गुजरात) मध्ये गेले होते घरी त्या व वृध्द आजी सासू अशा दोघीच होत्या. सोनाली दोन आठवड्यापासून ग्रामपंचायत मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करू लागली होती सोनालीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असल्याचे सरपंच प्राजक्ता शिरीषकुमार रोडे यांनी सांगितले.

loading image
go to top