उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

नानापेठेत शिवसेनेला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले
shiv sena protest
shiv sena protestSakal

पुणे - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने नानापेठेत शिवसेनेला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मात्र, शहराच्या इतर भागात शिवसैनिकांनी सावध भूमिका घेत पुढील घडामोडी काय घडतात त्यानुसार आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेदामुळे शिंदे यांनी बंड पुकारले आहे. समर्थक आमदारांसह त्यांनी सूरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केली आहे.

माजी नगरसेवस विशाल धनवडे यांच्यासह शिवसैनिकांनी नाना पेठेत संत कबीर चौक येथे उद्धव ठाकेर यांना पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी केली. गजानन पंडीत, उमेश गालिंदे, चंदन साळुंखे, स्वाती कथलकर, जावेद खान, रुपेश पवरा, संदीप गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या एका घटनेशिवाय शहरात शिवसैनकांनी समर्थनात घोषणाबाजी किंवा शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली नाही.

‘‘एकनाथ शिंदे यांच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात आंदोलन करा असा आदेश आम्हाला आलेला नाही. आम्ही शिवसेनेमध्ये आमचा विचार आणि ठाकरे कुटूंबीय यांनाच मानतो. वेळ पडल्यास शिंदे यांच्या विरोधात आंदोलनही केले जाईल. शहरातील सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत.’’

- गजानन थरकुडे, शहर प्रमुख, शिवसेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com