Professional Education Admission and Fee Rules Amendment : राज्यातील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश व शुल्क नियमांत लवकरच मोठे बदल

Special Committee Formed by State Government : २०१५ च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी निवृत्त प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; अवघ्या दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
Special committee formed to prepare revised draft of the act

Special committee formed to prepare revised draft of the act

Sakal

Updated on: 

पुणे : राज्यातील व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसह शुल्क नियमनाच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने २०१५ च्या प्रवेश व शुल्क विनियमन अधिनियमात सुधारणा करण्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. या समितीला सुधारित अधिनियम आणि नियमांचा मसुदा शिफारशींसह अवघ्या दहा दिवसांत सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत आणि खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्क निश्चितीच्या पद्धतीत कोणते बदल होणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...