पुणे : व्यावसायिक भरभराट, पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीशी अघोरी कृत्य

व्यावसायिक पतीने व्यावसायिक वृद्धी व पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
crime
crimesakal
Summary

व्यावसायिक पतीने व्यावसायिक वृद्धी व पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - अंधश्रद्धा विरोधी प्रकार बंद होण्यासाठी आणि नरबळी, जादूटोणा विरोधी कायदा अस्त्विात येण्यासाठी आयुष्य वेचलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले जात असतानाच, दुसरीकडे व्यावसायिक पतीने व्यावसायिक वृद्धी व पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी व्यावसायिकासह, सासू, सासरे व मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पती, सासू, सासरे तसेच मांत्रिकाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती हा व्यावसायिक असून ते कात्रजजवळील आंबेगाव परिसरात राहतात. 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनीच पती, सासू, सासऱ्यांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ, मारहाण करीत तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

दरम्यानच्या कालावधीत महिलेच्या आई-वडिलांनी मोठ्या विश्‍वासाने पतीकडे हिरेजडीत सोन्याचे दागिने व त्यांच्या सदनिकेची कागदपत्रे दिली होती. पती व त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित दागिन्यांचा परस्पर अपहार करुन महिलेच्या आई-वडिलांनी दिलेल्या सदनिकेची कागदपत्रे एका बॅंकेत कर्ज प्रकरणात तारण म्हणून ठेवली. संबंधित कागदपत्रांच्या आधारे 75 लाख रुपयांचे कर्ज घेत फिर्यादीच्या कुटुंबीयांची एक ते दोन कोटी रुपयायांची फसवणुक केली. या सगळ्या घडामोडीनंतर फिर्यादीचा पती एका मांत्रिकाच्या संपर्कात आला. मांत्रिकाने त्यास, व्यवसायात भरभराट, घरात सुखशांती तसेच पुत्रप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी महिलेस सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. त्यानंतरही त्याने पत्नीचा छळ सुरुच ठेवला. या सगळ्या प्रकारास कंटाळून फिर्यादी महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरुन पती, सासू - सासरा, मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करीत आहेत.

'संबंधित महिलेने आमच्याकडे तक्रार दाखल केली, त्याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल.'

- जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com