Pune : सुधारित प्रबंध सादर करण्यासाठी प्राध्यापिकेने मागितली २५ हजार रुपयांची लाच

विद्यार्थ्याने पीएच.डीसाठी तयार केलेल्या प्रबंधामध्ये सुधारणा करून तो पुन्हा सादर करण्यासाठी महिला प्राध्यापिकेने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
professor asked bribe of 25 thousand rupees to submit thesis phd student
professor asked bribe of 25 thousand rupees to submit thesis phd studentSakal

Pune News : विद्यार्थ्याने पीएच.डीसाठी तयार केलेल्या प्रबंधामध्ये सुधारणा करून तो पुन्हा सादर करण्यासाठी महिला प्राध्यापिकेने २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचेचे २० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) प्राध्यापिकेला ताब्यात घेतले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मार्गदर्शक (गाइड) म्हणून नेमलेल्या प्राध्यापिकेकडून हा प्रकार घडला. डॉ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९) असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. याबाबत ४० वर्षीय प्राध्यापकांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. डॉ. माने या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या कार्यालयात शनिवारी (ता. ३०) ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदारांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाइन प्रबंध तयार केला आहे. तो प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी डॉ. माने यांची मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाकडून नियुक्ती झाली आहे. या प्रबंधामध्ये सुधारणा करून त्याला मंजुरी देणे आणि त्याला सादर करण्यासाठी डॉ. माने यांनी तक्रारदारांकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली.

त्यातील पहिला हप्ता २० हजार रुपये घेतेवेळी एसीबीने कारवाई केली. पुणे क्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे येथील पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com