प्राध्यापिकेचा अपघानंतर साडेतीन वर्षांनी झाला मृत्यू

31dead_body_5B1_5D.jpg
31dead_body_5B1_5D.jpg

पुणे : अपघातानंतर साडेतीन वर्षांनी मृत्यू झालेल्या प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांना 1 कोटी 8 लाख 28 हजार 391 रुपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांनी दिला. प्राध्यापिकेचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निर्णय दिला. 

मृणालिनी जितेंद्रसिंग चौहान असे या प्राध्यापिकेचे नाव आहे. 20 मे 2012 रोजी त्या लक्‍झरी बसने माहेरी जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांची बस सिल्लोड-जळगाव रस्त्यावर बालापूर येथे झाडावर आदळली. यामध्ये त्यांना पॅराफ्यॉजिया (कमरेच्या खालच्या भागातील संवेदना नष्ट होणे) झाला होता. नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात न्यायप्राधिकरणात ऍड. जी.पी.शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. दरम्यान त्यांचा 16 डिसेंबर 2015 रोजी मृत्यू झाला. त्यांचे पती जितेंद्रसिंग आणि मुलगा कुणाल यांनी दावा चालविला. मृणालिनी यांचे वय 37 होते व त्या सिंहगड इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांना दरमहा 62 हजार 609 रुपये पगार होता. याविषयी ऍड. शिंदे यांनी सांगितले, उपचारासाठी आलेला खर्च, वार्षिक उत्पन्न, वय चाळीसच्या आत असल्याने भविष्यातील 50 टक्के वाढीव उत्पन्न, रुग्णालयात ऍडमिट असताना नातेवाइकांना झालेला त्रास या बाबी विचारात घेऊन नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे. दावा दाखल केलेल्या तारखेपासून म्हणजेच 23 ऑक्‍टोबर 2013 पासून वार्षिक सात टक्के व्याजही देण्यात यावे, असे निकालात नमूद आहे. 

''डॉक्‍टरांनी दिलेल्या अहवालात नैसर्गिक मृत्यू झाला आहे, असे म्हटले आहे. मात्र उपचार करणा-या डॉक्‍टरांच्या साक्षीनुसार, पॅराफ्यॉजिया झालेल्या व्यक्तींचे आयुष्यमान सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा कमी असते. रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याचा परिणाम हृदय आणि फप्फुसावर होत असतो. अपघातापूर्वी त्यांना इतर कोणताही आजार नव्हता, याचा विचार करून "प्री पॉन्डंरन्स ऑफ पॉसिबिलीटीज' ही थेरी विचारात घेऊन त्यांचा मृत्यू अपघातातील जखमांमुळेच झाला, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने काढला.''
- जी.पी. शिंदे, वकील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com