लॉकडाउनच्या काळात प्राध्यापकांने फुलविला भाज्यांचा मळा अन्...

दत्ता भोंगळे
Friday, 25 September 2020

लॉकडाउन व कोरोना काळातच भोर महाविद्यालयाची नोकरी सोडली. मग काय करायचे, उत्पन्नाचे साधन काय, हा विचार करीत असताना दाजी प्रशांत इनामके यांची शेती सासवड येथेच आहे. त्यांचा आदर्श घेत त्यांच्याच सीताफळ बागेत शेती करण्याचा निर्णय घेतला.

गराडे (पुणे) : लॉकडाउन व कोरोना काळातच भोर महाविद्यालयाची नोकरी सोडली. मग काय करायचे, उत्पन्नाचे साधन काय, हा विचार करीत असताना दाजी प्रशांत इनामके यांची शेती सासवड येथेच आहे. त्यांचा आदर्श घेत त्यांच्याच सीताफळ बागेत शेती करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात माळेगाव येथील विद्या प्रतिष्ठान येथील कमल नयन बजाज इंजिनिअरिंग कॉलेज येथे सहप्राध्यापक म्हणून मुलाखत दिली. पण कोरोनामुळे कॉलेज सुरू नव्हते. मग या काळात शेती करीत मिळविले हजारो रुपयांचे उत्पन्न मिळविले. सांगत होते सासवड (ता. पुरंदर) येथील ओंकार राजेंद्र गिरमे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फेब्रुवारीत शेती मशागत सुरू केली व कोथिंबीर लावली. मग मला लोकांनी सांगितले की, तुम्ही आणखी पालेभाज्या लावा. मग कोथिंबीरीबरोबर मेथी, वांगी, गवार, भेंडी, मिरची लावली. हे सर्व सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून 16 गुंठे जागेत केले. उत्पादन सुरू झाल्यावर लॉकडाउन असल्याने सासवड मार्केट बंद होते. ग्राहकांचे मला फोन यायचे आणि त्यांना मी हे घरी नेऊन भाजी द्यायचो. या 40 ते 60 दिवसांच्या काळात या आंतरपिकातून मला 35 हजार रुपये मिळाले, असे गिरमे यांनी सांगितले. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

 

 

ऑगस्टमध्ये पहिल्या भाज्या संपल्यामुळे अडीच हजार कोबी आणि अडीच हजार फ्लॉवर लावला. पण आता 1 सप्टेंबरपासून कॉलेज सुरू झाले आहे. ते करीत पुढे शेती करणार आहे. 
- प्रा. ओंकार गिरमे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The professor from Saswad earned thousands from agriculture