पुुणे पदवीधरसाठी पाटील यांना विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबा

Professor Sharad Patil has the support of various parties and organizations for pune Graduate Election
Professor Sharad Patil has the support of various parties and organizations for pune Graduate Election

पुणे : पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील विविध पक्ष आणि संघटनांनी जनता दल (सेक्‍युलर) पक्षाचे उमेदवार प्रा. शरद पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रा. पाटील हेच विजयी होतील, असा दावा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी (ता.25) पत्रकार परिषदेत बोलताना केला.

'...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​

पाटील यांच्या उमेदवारीस लोकभारती, सोशालिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी, बहुजन विकास आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, या पक्षांसह शिक्षक भारती, शिक्षक लोकशाही आघाडी (टीचर्स डेमाक्रेटिक फ्रंट), लोकायत पुणे, ओबीसी संघर्ष सेना, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, आदींसह शिक्षक आणि पदवीधर क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​

यावेळी जनता दलाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल सातव, प्रदेश युवा अध्यक्ष नाथा शेवाळे, लोकायतचे नीरज जैन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, मुंबई विभागीय अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रदेश महासचिव अजमल खान आदी उपस्थित होते.

दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com