प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

पिंपरी : चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे गेल्या अडीच महिन्यांपासून नूतनीकरण सुरू आहे. मात्र, कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत ऑक्‍टोबरपर्यंत काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

पिंपरी : चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे महापालिकेतर्फे गेल्या अडीच महिन्यांपासून नूतनीकरण सुरू आहे. मात्र, कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत ऑक्‍टोबरपर्यंत काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

नूतनीकरणासाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह 1 मेपासून सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले. तेव्हापासून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी 17 कोटी सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या नाट्यगृहाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी बाजूचे स्थापत्यविषयक काम सुरू आहे. त्याशिवाय, नाट्यगृहाची अंतर्गत सजावट, छत, स्वच्छतागृह व फ्लोअरिंगची दुरुस्ती, ऍटोमॅटिक वातानुकूलित व्यवस्था, रंगमंच सुधारणा, अग्निशमन यंत्रणा आदी कामे सुरू आहेत.

नाट्यगृहाची दर्शनी बाजू आकर्षक करण्यासाठी काही म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. ध्वनी व्यवस्था, पडदे, सौरऊर्जा यंत्रणा, कलाकारांच्या ग्रीनरूमचे नूतनीकरण आदी कामे नियोजित आहेत. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणावर काम शिल्लक आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल की नाही, याविषयी साशंकता आहे. 

''प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या दर्शनी भागाचे स्थापत्यविषयक व अंतर्गत काम सध्या वेगात सुरू आहे. ऑक्‍टोबरअखेर ते पूर्ण करण्याचे प्रयत्न राहातील."

- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग 

Web Title: Proff. More Renewal of the Auditorium