खड्ड्यात झाडे लावून सरकारचा निषेध

pune.jpg
pune.jpg

उरुळी कांचन(पुणे) पाबळ-उरुळी कांचन ते जेजुरी राज्यमार्गावर (राज्य मार्ग क्र ६१) उरुळी कांचन ते जेजुरी या दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले अाहेत. यामार्गे जेजुरीला खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्यांमुळे खूप हाल होत आहेत. या रस्त्यावरून चालणे देखील मुश्कील झाले आहे. वारंवार मागणी करुनही, रस्तांची डागडुजी होत नसल्याच्या निषेधार्थ शिंदवने गावचे सरपंच गणेश महाडीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपन करुन सरकार, विद्यमान लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. 

पुणे-सालापुर महामार्गावरुन जेजुरीला जाण्यासाठी पाबळ- उरुळी कांचन ते जेजुरी हा राज्यमार्ग आहे. या रस्त्याने जेजुरी, आळंदी, पंढरपूर, प्रति बालाजी ,मोरगावचा मयुरेश्वर, नारायणपूर देवस्थान, थेऊरचा चिंतामणी, संत सोपान काका समाधीचे दर्शनासाठी लाखो भाविक ये जा करीत असतात मात्र या रस्त्याकडे पुरंदर तसेच शिरूर हवेली या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी जे सत्ताधारी आहेत.  अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेकडो प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर, अनेकांना आपला जीव नाहक गमवावा लागला आहे. या रस्त्यातील खड्यामुळे वाहने नादुरुस्त होण्यामुळे आर्थिक व आदळआपट होण्याने शारीरिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत स्थानिक नागरीक व या भागातील ग्रामपंचायतीना वारंवार पाठपुरावा करुनही, शासनाकडुन दुर्लक्ष केले जात असल्याने, ग्रामस्थांनी बुधवारी (ता. 21) रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपन करुन सरकार, विद्यमान लोकप्रतिनिधी व सार्वजणिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. 

याबाबत अधिक बोलताना शिंगवने गावचे सरपंच गणेश महाडीक म्हणाले, या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजऩिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी निवेदन दिलेले आहे. मात्र जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्याचे धोरण अधिकाऱ्यांनी अवलंबल्याने ग्रामस्थांना वरील निर्णय घ्यावा लागला आहे. या रस्त्यावर यापुर्वीही अनेकवेळ निधी मिळालेला आहे. मात्र ठेकेदाराकडून दर्जेदार कामे करून घेण्याऐवजी अधिकारीच ठेकेदाराशी संगनमत करत असल्याने, रस्त्यांची आजची अवस्था झाली आहे. रस्ते टिकत नाहीत हे माहिती असून देखील अधिकारी वर्ग दुर्लक्ष करतो ही प्रवृत्ती विकासाला घातक आहे. पुढील चार दिवसांत खड्डे तातडीने न बुजविल्यास सोमवारी (ता. 26) याच रस्त्यावर रास्ता रोको करून भजन करण्यात येणार असल्याचे, महाडिक यांंनी स्पष्ठ केले. 

यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानासाहेब महाडीक, माजी अध्यक्ष मुकेश महाडिक, गोकुळ महाडिक, माजी उपसरपंच प्रवीण देशमुख, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश महाडिक, कांतीलाल महाडीक, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ महाडीक, सोमनाथ चव्हाण, सचिन शिंदे, माऊली महाडीक, राजाराम महाडीक, दत्तात्रय महाडीक, सोहम साबळे,अविनाश महाडीक , अभिजित महाडीक यांच्यासह पुरंदर हवेली तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com