पुणे शहरात मनाई आदेश; आता नियम पाळावेच लागणार!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद, उपोषण, आंदोलनाचे आयोजन करतात. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून 22 सप्टेंबरपासून 5 ऑक्‍टोबरपर्यंत 14 दिवसांसाठी कोणतेही शस्त्र बाळगणे, अर्वाच्च घोषणा, वाद्ये वाजविणे यामुळे सुरक्षितता धोक्‍यात येईल यासाठी मनाई करण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाहनांचा वापर, वाहतूक बंदी, जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत आणि संचारास मनाई करणारे आदेश यापूर्वी लागू केले आहेत. हे आदेश येत्या पाच ऑक्‍टोबरपर्यंत जारी राहतील, असे पोलिस आयुक्‍तालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद, उपोषण, आंदोलनाचे आयोजन करतात. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून 22 सप्टेंबरपासून 5 ऑक्‍टोबरपर्यंत 14 दिवसांसाठी कोणतेही शस्त्र बाळगणे, अर्वाच्च घोषणा, वाद्ये वाजविणे यामुळे सुरक्षितता धोक्‍यात येईल यासाठी मनाई करण्यात आली आहे. 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुले आणि इतर कोणत्याही व्यक्तीस अनावश्‍यक वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक रस्त्यांवर, गल्लीमध्ये येण्यास, घराबाहेर पडण्यास व जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

पोलिस आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा, मिरवणुका काढण्यास अथवा गर्दी करण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्‍ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 135 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेश शहर पोलिस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी जारी केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prohibition order issued in Pune city till October 5