आश्वासन 100 रुपयांचे पण भागवले एका वडापाववर...

आश्वासन 100 रुपयांचे पण भागवले एका वडापाववर...

पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारला विरोध करण्याची एक संधीही भाजपकडून सोडली जात नाही. त्यातच आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात निदर्शने केली. मात्र, यातील अनेकांना 'भाडेतत्वा'वर आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनसीआर) विरोधात देशभरात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारविरोधात भाजपकडून मोठ्या प्रमाणात घेरण्याचे काम सुरु आहे. शेतकरी कर्जमाफी, ऍट्रॉसिटी यांसारख्या मुद्द्यांवरून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते धीरज घाटे, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि माजी मंत्री दिलीप कांबळे हेदेखील उपस्थित होते.   

100 रुपयांचे आश्वासन

राज्य सरकारविरोधात निदर्शनं करण्यासाठी 100 रुपयांचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. मात्र, त्यांना 100 रुपये न देता फक्त एक वडापाव देऊन बोळवण करण्यात आली.

कशासाठी हजर माहितीच नाही

जेव्हा या भागातील नागरिकांनी गर्दी केली. मात्र, त्यांना माहितीच नव्हते, की ते कशासाठी येथे आले. या मोर्चेकरांना नगरसेवकांनी आणल्याचे सांगितले जात आहे. 

नगरसेवकांनी येण्यास सांगितले

या आंदोलनात काही महिला आपल्या मुलांसोबत येथे आल्या. माझ्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले होते. म्हणून मी येथे आले. आमच्या नगरसेवकांनी यायला सांगितले होते. त्यामुळे आम्ही येथे आलो, असे सिंहगड रोड येथील रहिवासी दिपाली पाटोळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com