महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट गावांमध्ये अखेर ‘प्रॉपर्टी कार्ड’ देण्यास मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांतील मिळकतींना ‘प्रॉपर्टी कार्ड’ देण्याच्या मोहिमेला अखेर मुर्हूत मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात बाणेर, बालेवाडी, महंमदवाडी आणि खराडी गावांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर पीएमआरडीएच्या मदतीने या गावांतील मिळकतींचे येत्या महिनाभरात सर्वेक्षण करून मिळकदारांना प्रॉपर्टी कार्ड दिले जातील. त्यामुळे या गावांत आता सातबारा उतारे बंद होणार आहेत.

पुणे - महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांतील मिळकतींना ‘प्रॉपर्टी कार्ड’ देण्याच्या मोहिमेला अखेर मुर्हूत मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात बाणेर, बालेवाडी, महंमदवाडी आणि खराडी गावांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर पीएमआरडीएच्या मदतीने या गावांतील मिळकतींचे येत्या महिनाभरात सर्वेक्षण करून मिळकदारांना प्रॉपर्टी कार्ड दिले जातील. त्यामुळे या गावांत आता सातबारा उतारे बंद होणार आहेत.

महापालिकेच्या हद्दीत १९९७ मध्ये २३ गावांचा समावेश केला होता. परिसरातील मिळकतदारांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ देण्याचा प्रकल्प महापालिकेने दहा वर्षांपूर्वी घेतला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यासाठी भूमी अभिलेख विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यानुसार २००७ मध्ये या गावांतील मिळकतींचे सर्वेक्षण झाले. मात्र, त्यास परवानगी देण्यास राज्य सरकारकडून विलंब झाला. त्यामुळे हे काम थांबले होते. सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरही त्यात विविध अडचणी निर्माण झाल्याने हे काम थांबले होते. ते आता पूर्ण करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

गेल्या दहा वर्षांत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे या गावांचे आता नव्याने सर्वेक्षण करावे लागणार आहे. गेल्या वर्षी पीएमआरडीएकडून या गावांचे क्षेत्र (एरियल) सर्वेक्षण केले आहे. गावांच्या हद्दी कायम आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाची मदत घेऊन जुन्या नकाशावर सुपर इम्पोज (पर्याय) करण्याचा प्रयोग बाणेरमध्ये राबविण्यात आला. तो यशस्वी झाल्याने समाविष्ट गावांतील मोजणी या प्रकारे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चार गावातील मिळकतींची मोजणी झाल्यानंतर उर्वरित गावांतील मिळकतींची मोजणी करून प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अरे कारट्या काय केलंस हे! खेळता खेळता मुलानेच आईला...

‘प्राप्रर्टी कार्ड’चे फायदे 
*गावांची हद्द आणि मिळकतीची हद्द होणार निश्‍चित 
* मिळकतदारांना जमिनीचा कायदेशीर पुरावा मिळणार
* कर्ज, खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पारदर्शकता येणार 
* परिसरातील अतिक्रमणे काढणे होणार शक्‍य
* सातबारा उतारा हद्दपार होऊन मिळणार प्रॉपर्टी कार्ड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property card distribution in municipal involve village