Pune News : कचरा संकलनाचे काम स्वच्छला देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला

महापालिका प्रशासनाने स्वच्छ संस्थेला २०२३ ते २०२८ पाच वर्षाच्या कालावधीत घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करण्याची मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.
कचरा संकलनाचे काम स्वच्छला देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला
कचरा संकलनाचे काम स्वच्छला देण्याचा प्रस्ताव पुढे ढकललाSakal

पुणे : महापालिका प्रशासनाने स्वच्छ संस्थेला २०२३ ते २०२८ पाच वर्षाच्या कालावधीत घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे काम करण्याची मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

मात्र, प्रशासक विक्रम कुमार यांनी हा प्रस्ताव आज (ता.९) मान्य करता पुढच्या सभेत त्यावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वच्छ संस्थेला काम देण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेने २००८ पासून शहरात ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा संकलन केला जातो. सध्या स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून ३ हजार ६८२ कचरा वेचक कार्यरत असून त्यापैकी ७० टक्के महिला आहेत.

या कचरा वेचकांना प्रति घर ८० रुपये सेवाशुल्क नागरिक देतात. या कचऱ्यातील रद्दी व भंगार साहित्य याच्या विक्रीतून कचरा वेचकांना थोडाफार हातभार लागतो. प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा पाच वर्षांचा करार केला होता. पण २०२१ नंतर अल्प कालावधीचे करार झाले आहेत. आॅक्टोबर महिन्यात स्वच्छ संस्थेचा करार संपल्यानंतर त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.

दरम्यान स्वच्छ संस्थेने पूर्वीच्या करारात बदल करून नव्या काही तरतुदींचा विचार करून सुधारित करार करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावर आत्तापर्यंत तीन ते चार बैठका झाल्या आहेत. त्यानुसार पर्यवेक्षकांची संख्या वाढविणे, कचरा संकलनाचे शुल्क वाढविणे, कचरा वेचकांना सुविधा देणे यासह इतर तरतुदींसह सुधारित प्रस्ताव तयार केला आहे.

यावर शिक्कमोर्तब झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनातर्फे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला. प्रशासक विक्रम कुमार यांनी आज स्थायीची बैठक घेतल्यानंतर त्यात हा प्रस्ताव मान्य न करता त्यावर पुढील बैठकीत यावर विचार केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com