जुन्नर - बालिकेवरील अत्याचाराप्रकरणी निषेध

दत्ता म्हसकर
सोमवार, 23 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : चार वर्षाच्या बालिकेस आमिष दाखवून तिच्यावर 26 वर्षीय तरुणाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आज विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे.

जुन्नर पोलिसांनी याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीस फाशीची शिक्षा होईल असा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आज तालुक्यातील हल्लाबोल टीम, शिवजन्मभुमी संघटना, कन्यारत्न परिवार, मुस्लिम-मराठा अस्मिता अधिकार, तनिष्का व्यासपीठ, तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान, युवाशक्ति संघटना, राजमाता जिजाऊ महिला संघटना आदींच्या यांच्या वतीने जुन्नर पोलिस व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व त्या चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कॉग्रेस सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, महिला व युवक उपस्थित होते. 

Web Title: Protest against child abuse in junnar