पुणे - पुणे महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम आणि मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्यात झालेल्या हमरीतुमरीवरून आज शहरात पडसाद उमटले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालिका भवनातील हिरवळीवर एकत्र येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला तसेच असले वर्तन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर महापालिका भवनासमोर महाविकास आघाडीतर्फे प्रशासनाविरोधात आंदोलन करून अधिकाऱ्यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत सभ्यपणे वर्तन करावे असे बजावले.