घोडेगावात मोदी सरकारविरोधात निषेध मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील अहिल्यादेवी होळकर चौकात केंद्रीय कृषी विधेयकाचा जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

घोडेगाव : केंद्र सरकारने मंजुरी दिलेले केंद्रीय कृषी विधेयक हे देशातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानींना सामोरे जावे लागेल त्यामुळे हे विधेयकामध्ये बदल करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील अहिल्यादेवी होळकर चौकात केंद्रीय कृषी विधेयकाचा जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

यावेळी सहसंपर्क सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरूण गिरे, जिल्हा परिषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हा प्रमुख रविंद्र करंजखिले, सुनिल बाणखेले, शिवाजी घोडेकर, मिलींद काळे, विजय घोडेकर, कल्पेश बाणखेले, माजी सरपंच दत्ता गांजाळे, तुकाराम काळे, शिवाजी राजगुरू, सागर काजळे उपस्थित होते. घोडेगाव बाजारपेठेतून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी आढळराव म्हणाले, या कृषी विधेयकामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला आधारभुत किंमत निश्चित न करता खाजगी व्यापारी व उद्योगांना शेतकऱ्यांच्या बांधावर थेट शेतमालाची मुभा देण्यात आली आहे. त्यात व्यापाऱ्यांना शेतमाल साठवणुक करता येणार आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या विधेयकात शेतकरी हितासाठी बदल करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यावेळी निषेधाचे निवेदन नायब तहसिलदार अनंता गवारी यांना देण्यात आले. 

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest march against Modi government in Ghodegaon