इंदापुरात पडळकरांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध

डाॅ. संदेश शहा
Thursday, 25 June 2020

देशाचे पंतप्रधान देखील पवार यांच्या कार्याचे कौतुक करतात. त्यामुळे पडळकर यांनी आपली भाषा न बदलल्यास जिल्ह्यात ते जिथे जातील, तेथे जोडे खातील, असा इशारा या वेळी देण्यात आला.

इंदापूर (पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर पोलीस ठाण्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 

पडळकर यांच्याविरूद्ध बारामतीत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल हेगडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, स्मिता पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांचा जाहीर निषेध केला. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना गारटकर, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, तात्यासाहेब वडापुरे, वसंत आरडे, किसनराव जावळे, दिलीप वाघमारे यांना मागण्यांचे निवेदन दिले. 

मुळशीतील तिघे कोरोनामुक्त, मात्र आणखी...

या वेळी प्रदिप गारटकर म्हणाले, आमचे नेते शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र घडविला. सत्तेत असताना तसेच सत्तेबाहेर असताना देखील त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान देखील पवार यांच्या कार्याचे कौतुक करतात. त्यामुळे पडळकर यांनी आपली भाषा न बदलल्यास जिल्ह्यात ते जिथे जातील, तेथे जोडे खातील.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

या वेळी शहराध्यक्ष अनिल राऊत, वसंत आरडे यांची भाषणे झाली. या वेळी अरबाज शेख, अविनाश मखरे, राजू चौगुले, राकेश गानबोटे, हरीदास हराळे, अण्णासाहेब धोत्रे, दादासाहेब सोनवणे, दत्तात्रेय मोरे, सुनील अडसूळ आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest of MLA Padalkar from NCP in Indapur