दोरीने रिक्षा ओढून केला इंधन दरवाढीचा निषेध

मिलिंद संगई
Friday, 5 February 2021

शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार बारामतीत आज शिवसैनिकांनी इंधन दरवाढीविरुध्द आंदोलन केले. पुणे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेल दरवाढीचा आज निषेध नोंदविण्यात आला.

बारामती : इंधन दरवाढीचा आज बारामतीत शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. शहरातील भिगवण चौकात रिक्षाला दोरी बांधून रिक्षा त्या दोरीने ओढून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षाला दोरी बांधून शिवसैनिकांनी ही दोरी ओढत निषेध नोंदविला. ही दरवाढ सामान्य माणसाला परवडणारी नसून यामुळे महागाई पुन्हा वाढणार असल्याने तातडीने ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. 

राज्यपालांनी आता आमचा अंत पाहू नये : अजित पवार
 

बाळासाहेब शिंदे, राजेंद्र पिंगळे, विश्वास मांढरे, पप्पू माने, नीलेश मदने, सुदाम गायकवाड, दत्ता लोणकर, रंगनाथ निकम, शौकत बागवान, सुदर्शन रणवरे, सतीश काटे, रमेश खलाटे, राजेंद्र साळुंखे, उमेश दुबे, गोकुळ रेडे, राजेंद्र गलांडे, संतोष सातपुते, अविनाश कदम, गजानन रायते, दादा दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest by shivsena for hike in fuel price in Baramati area