Provision for Pune in Maharashtra budget 2020
Provision for Pune in Maharashtra budget 2020

आता पुणे होणार क्रीडानगरी; अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे : महाविकासआघाडी सरकारच्या पहिला-वहिला अर्थसंकल्प आज (ता. ६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात अर्थसंकल्पात पुणकेरांनाही खूश ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता क्रीडा क्षेत्रातही आगेकूच करण्यास सज्ज आहे. पुण्यात क्रीडा विद्यापीठ व ऑलिंपिक भवन उभारण्याचे महाआघाडीचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

बालेवाडीमध्ये सध्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सध्या अनेक नव्या पिढीच्या खेळाडूंना तयार केले जाते. आता याच बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार आहे. या विद्यापीठामध्ये विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारी तयारी करुन घेतली जाईल तसेच क्रीडा प्रकारांचा अभ्यासक्रम करुन घेतला जाईल.

याशिवाय पुण्यात ऑलिंपिक भवन उभारणार असल्याचीही घोषणा पवारांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. आता जिल्हा क्रीडा संकुलाला 25 कोटींची निधी दिला आहे.

पुणे मेट्रो व रिंगरोड
पुणे मेट्रोबाबतही पवारांनी मोठी घोषणा केली. मागील पाच वर्षांत मेट्रोसाठी जितका निधी दिला गेला त्यापेक्षा जास्त निधी आघाडी सरकार देईल असे आश्वासन पवार यांनी दिले. तसेच स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रो ट्रॅक लवकरच मंजूर होईल असेही त्यांनी सांगितले. रिंगरोडसाठी भूसंपादन, हा मार्ग ‘एमएसआरडीसी’चया माध्यमातून भूसंपादन राज्य तर, मार्गाची बांधणी केंद्र सरकार करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांसाठी तरतूद
राज्यातील महिला सुरक्षाबाबतही पवारांनी भाष्य केले. पुण्यात नोकरी करणाऱ्या 1000 महिलांसाठी वसतिगृह सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com