#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....

#MahaBudget2020 : अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील A टु Z मुद्दे....

मुंबई - महाविकास आघाडीचा आज पहिलावहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. 

मित्रपक्षांच्या लोकाभिमुख सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली म्हणून अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानलेत. देशात कसोटीचा काळ आहे, आर्थिक मंदीच्या सावटामुळे देशाला गंभीर परिणामांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आर्थिक गती, रोजगार निर्मिती याचा आलेख उतरता असल्याचं अजित पवार म्हणालेत. राज्यातील सर्व घटकांचा विकास, तरुणांना रोजगार, आरोग्य सेवा हा संकल्प डोळ्यासमोर अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केला. 

केंद्राकडून GST परतावा मिळण्यास उशीर होतोय त्यामुळे राज्यातील विकास कामं करायला अडचण येतेय. अर्थव्यवस्थेला उत्तेजन देण्याचं आव्हान स्वीकारत पुढील वाटचाल करावी लागणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेने अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची सुरवात केली.

  • महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजना सरकारने राबवली 
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय होतोय 
  • 190-20 मध्ये कर्जमाफीसाठी रुपये 15 हजार कोटींची तरतूद केली होती, यंदा यामध्ये आणखी 7 हजार कोटींची तरदूद करून एकूण 22 हजार कोटींची कर्जमाफी आम्ही देणार आहोत  
  • आतापर्यंत 9 हजार 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा 
  • उर्वरित रक्कम खरीपपूर्वी जमा करण्यात येईल 
  • नियमित रक्कम भरणाऱ्यांसाठी 50 हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल 
  • प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत अनेक त्रुटी आहेत, यासंदर्भातील निकष आणि मतभेद यावर अभ्यासगट नेमण्यात आला. याबाबत केंद्राकडे पाठपुराव होईल 
  • वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची विम्यान भरपाई मिळावी यासाठी काही विमा कंपन्यांशी चर्चा करणार 
  • राज्यात जलसंधारणाची कामं झालीत मात्र देखभाल न केल्याने पाणीसाठा राहिला नाही यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवणार 
  • ठिबकवर जास्त सवलत दिली जाणार, येत्या काळात ऊसाची संपूर्ण शेती ठिबक खाली आणणार.   
  • शेती पंपासाठी नवीन जोडणी देणं चालू करणार 
  • भंडाऱ्यात नवीन कृषी विद्यापीठ बनवण्यात येणार 
  • सागरी निम खारं पाणी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी स्वतंत्र योजना राबवणार  
  • कृषी ,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायासाठी 3224 कोटी रुपयांची तरतूद  
  • रेशीम शेतीसाठी आणि त्याच्या मशिनरीसाठी अनुदान देणार  
  • राज्यातील 313 अपूर्ण असे सिंचन प्रकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न 
  • मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू करणार
  • शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी 10 हजार कोटींची योजना सुरू करणार
  • कोकणचा विकास आमच्या सरकारसाठी प्राधान्यासाठी
  • रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग काँक्रीटीकरण करणार 
  • नागरी विकासासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांसाठी नागरी सडक योजना राबवणार
  • पुणे मेट्रोसाठी मागील पाच वर्षात जो निधी दिला त्याच्या पेक्षा जास्त निधी यंदा देणार 
  • ग्रामीण सडक योजना सुरू करत आहोत, 80 हजार किलोमीटर रस्त्यांची कामं करणार 
  • सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ उभारणार
  • ग्रामीण भागात बसमध्ये वायफाय सुरू करणार
  • एसटीच्या 1600 जुन्या बस बदलणार
  • विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे बस सेवा सुरु करणार
  • आरोग्याच्या 187 इमारतींची बांधकामं रखडलेली आहेत. ती कामं पूर्ण करणार
  • 500 नवीन रुग्ण वाहिकांची खरेदी करणार, यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद
  • प्रत्येक तालुक्यात प्रत्येकी चार शाळा आदर्श शाळा बनवणार, राज्यात 1500 आदर्श शाळा तयार करणार
  • कर्नाटक राज्यातील मराठी वर्तमानपत्रांना जाहिरात देण्यात येईल
  • तालुका क्रीडा संकुल अनुदान मर्यादा वाढवणार
  • उच्च व शिक्षण विभागासाठी 1300 कोटी वाढणव्यात आले आहेत
  •  स्थानिक युवकांना 80 टक्के नोकरी मिळावी यासाठी कायदा करणार
  • अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी कर्ज उपलब्ध करून दिल जाईल, यासाठी 50 कोटी तरतूद असणार
  • महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण झालेत, बचत गटातून खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येईल 
  • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस स्टेशन उभारणार
  • प्रत्येक शाळेत मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल जाईल
  • राष्ट्रीय पेयजल योजना ही जलजीवन योजना म्हणहून सूरु करणार
  • मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
  • नवी मुंबईतील वाशीमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार
  • मागील वर्षात 50 लाख वृक्ष लागवडीचा दावा करण्यात आला आहे, त्याची देखभाल केली जाईल
  • वरळीतील डेरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुलन उभारणार
  • मराठी नाट्य संमेलनासाठी 10 कोटी रुपये 
  • पुणे येथे नोकरी करणाऱ्या 1000 महिलांसाठी वसतिगृह सुरू करणार
  • तृतीयपंथी यासाठी मंडळ स्थापन 5 कोटी रुपये देनार
  • ठाण्यात हज हाऊस बांधणार
  • पुण्यात बालेवाडी म्हाळुंगे मध्ये आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यालय उभारणार  
  • पुण्यात ऑलम्पिक भवन बनवणार  
  • नवी मुंबईत होणाऱ्या ज्युनियर फ़ुटबाँल विश्व चसकांसाठी निधी देणार 
  • कबड्डी, कुस्ती आणि खोखो साठी ५० लाखांची ७५ कोटी 
  • मिनी ऑलम्पिक महाराष्ट्रात स्पर्धा सुरु करणार 
  • पेट्रोल-डिझेल वरती 1 रुपया अतिरिक्त कर वाढवला
  • औद्योगिक वापरातील वीज दरातही कपातीची घोषणा
  • मंदीमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आहेत, उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही सवलती राज्य सरकार देणार 
  • गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह विविध स्मारकांसाठी निधी, धार्मिक स्थळांच्या विकासासाठीही निधीची तरतूद

maharashtra budget 2020 know all pointers of budget presented by FM ajit pawar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com