'श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद'

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 4 जुलै 2018

मंचर (पुणे): 'श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र (ता. खेड सह ता. आंबेगाव) विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद राज्यशासनाने केली आहे,' अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष व भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (पुणे): 'श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र (ता. खेड सह ता. आंबेगाव) विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद राज्यशासनाने केली आहे,' अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष व भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, 'बुधवारी (ता. ४) राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या पूरक मागण्यामध्ये सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी आर्थिक तरतूद केली आहे. यासंदर्भात मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने पाठपुरावा केला होता. भीमाशंकर आराखड्यासाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने १४८ कोटी ३७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. विकास आराखड्यामार्फत सामुहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक शौचालय, हेलीपॅड, कॉंक्रीट रस्ते, परिसर सुधारणा व सीमा भिंत, पोलीस स्टेशन इमारत, दुकान गाळे, चप्पल स्टँड, भीमा नदी उगमस्थान जवळील परिसराचे सुशोभिकरण, वनेत्तर वापरासाठीचा खर्च एनपीव्ही (FRA and FCA) व खाजगी जमीन भूसंपादन मोबदला. पथदिवे, सीसीटीव्ही, डिजिटल डीस्प्ले, साऊंड सिस्टीम, अग्नी प्रतिबंध उपाययोजना, पायरीमार्ग येथील विद्युतीकरण व प्रकाश व्यवस्था, मुख्य मंदिर संवर्धन, नवीन दगडी मंडप बांधकाम, नवीन ओवऱ्या व सीमा भिंत, सर्वतीर्थ व मोक्ष कुंड जतन संवर्धन, उर्वरित चार कुंड व जलमार्गाचे सुशोभिकरण, गायमुख प्रकारचे भाविकांसाठी पाय धुण्याची व्यवस्था, पाणी पुरवठा, भुयारी गटारी योजना, घन कचरा व मलनिस्सारण, भूमिगत केबल्स, कोंडवळ तलावातून पाण्याच्या स्श्रोताचे बळकटीकरण, आरोग्य पथक इमारत बांधकाम, वाहनतळ, प्रसाधनगृह, मिनी बसेस, पिण्याच्या पाण्यासाठी आरो युनिट बसविणे, महादेव वन कामे, वन विश्रामगृहे, वनक्षेत्रातील पायवाटा व मोबाईल सेवा बळकटीकरण. इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. अर्थ संकल्पित तरतुदीनुसार लवकरच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना सुरवात होईल.’’

Web Title: Provision of Rs 22 crores for the development plan of bhimashankar