

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२३मध्ये घेतलेल्या पीएसआय परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी बाबुराव केदारी यांचं निधन झालं. काही दिवसांपूर्वी अपघातानंतर त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. पण रुग्णालयात उपचारावेळीच वयाच्या ३०व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अश्विनी केदारी या खेड तालुक्यातल्या पाळू या गावच्या होत्या. २०२३च्या पीएसआय परीक्षेत राज्यात मुलींमधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.