पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमचा 'डोनेट अ मील' उपक्रम

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमचा 'डोनेट अ मील' उपक्रम

पुणे : शहरात उद्भवलेल्या या संकटाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरम सज्ज झाले आहे. फोरमच्या वतीने ‘डोनेट अ मील’ हा उपक्रम राबविण्यात आला असून, यामध्ये गरजू नागरिकांना सॅनिटायझर, मास्क व जेवणाचे वाटप करण्यात आले.

पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सचे मंगेश काटे, लॉईटस दास, शेखर मेहता, सुनील बिडलाम यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लब व रोटरी क्लबच्या मदतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मिलिंद दातार, कीर्ती दातार, लायन्स क्लब आकुर्डीचे हिरामन गवई, रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या टीना रात्रा, फ्युजन स्पाईसचे नवीन राय, विराज चव्हाण, न्यू प्रशांत एन्टरप्राईजचे प्रशांत आदी उपस्थित होते.

उपक्रमांतर्गत नुकतीच पोरवाल रस्ता येथे १५ गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणामाल सामानाचे वाटप करण्यात आले. याबरोबरच शहरातील येरवडा, विमानतळ पोलिस स्टेशन व जागोजागी थांबलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नारळपाणी, मास्क, सॅनिटायझर वाटप करीत त्यांचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच शहरातील विविध भागातील गरजू नागरिकांना रोज चहा, नाष्टा, जेवण दिले जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com