मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच बोस्टन (इंग्लंड) येथे निधन झाले.

पुणे  : प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुद्रेश पाठक (वय 65) यांचे नुकतेच बोस्टन (इंग्लंड) येथे निधन झाले. मागील तीन महिन्यांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. 70 दिवस व्‍हेंटीलेटरवर राहून देखील त्‍यांनी कोरोनावर मात करुन ते बरे झाले होते. तथापि, मेंदूच्या पक्षाघाताने त्‍यांचे निधन झाले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. भारती, मुलगी नेहा, मुलगा अनिश असा परिवार आहे. पुणे येथील विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे ते मेहुणे होते.

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

डॉ. रुद्रेश पाठक हे बोस्टन येथील पिलग्रीम हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली होती.

आळंदीचे मुख्याधिकारी भूमकर यांची बदली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatrist Dr. Rudresh Pathak passes away