लोकजागरसाठी उद्या सार्वजनिक चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

पुणे : नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नागरिक सभेतर्फे येत्या सोमवारी (ता. 12) शहरात 12 ठिकाणी सार्वजनिक चर्चेचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता ही चर्चा सर्वत्र होणार आहे. 

पुणे : नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या प्रश्‍नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र नागरिक सभेतर्फे येत्या सोमवारी (ता. 12) शहरात 12 ठिकाणी सार्वजनिक चर्चेचे आयोजन केले आहे. दुपारी बारा वाजता ही चर्चा सर्वत्र होणार आहे. 

टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालयासमोर शिक्षण या विषयावर लोकेश लाठे, डॉ. शमसुद्दीन तांबोळी तर आरोग्यावर सुजित केंगार आणि डॉ. मोहन देस ससून हॉस्पिटलसमोर, रोजगारावर अनुप देशमुख, माधव पळशीकर शास्त्री रस्त्यावरील अहल्या अभ्यासिकेसमोर नागरिकांशी संवाद साधतील. स्त्री-अधिकार या विषयावर कल्याणी माणगावे, गीताला वि. म. सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले स्मारकाजवळ, शेती व पाणी या विषयावर सुनील अभंग, मुकुंद किर्दत गोखले इन्स्टिट्यूटसमोर चर्चा करतील. पर्यावरणावर शताक्षी गावडे, प्रशांत कोठडिया शिवाजीनगरजवळील शिमला ऑफिससमोर, कला-साहित्य-संस्कृतीवर सुशीलकुमार शिंदे आणि धनाजी गुरव बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्याजवळ बोलतील. सामाजिक न्यायावर संदीप बर्वे, नितीन पवार सिंहगड रस्त्यावरील दांडेकर चौकात चर्चा करतील. 

सार्वजनिक वाहतुकीवर अभिजित मंगल आणि विवेक वेलणकर स्वारगेटजवळील केशवराव जेधे पुतळ्याजवळ बोलतील. सार्वजनिक स्वच्छता आणि सार्वजनिक पाणीपुरवठ्यावर विवेक भरगुडे, किरण मोघे महापालिकेसमोर, कायदा-सुव्यवस्थेवर कुणाल शिरसाठे, अन्वर राजन पोलिस आयुक्तालयासमोर चर्चा करतील. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीवर हरीश पोटे, अजित अभ्यंकर अलका टॉकीज चौकातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर संवाद साधतील, अशी माहिती महाराष्ट्र नागरिक सभेचे समन्वयक संदेश भंडारे यांनी दिली.

Web Title: Public discussion tomorrow for public life