

Belsar Toll Row Escalates: Locals Demand Toll-Free Passage and Relocation of Plaza
sakal
जेजुरी: पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलसर टोलनाक्यावर (ता. पुरंदर) स्थानिक टोल भरणार नाहीत, टोलनाका बंद करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भर उन्हात सोमवारी (ता.८) दुपारी आंदोलन केले. टोल वसुलीची सक्ती केल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पुरंदरवासी टोलविरोधी संघर्ष समितीने दिला आहे.