esakal | 'पुण्यभूषण' दिवाळी अंकाचे वैशाली कट्ट्यावर साधेपणाने प्रकाशन
sakal

बोलून बातमी शोधा

'पुण्यभूषण' दिवाळी अंकाचे वैशाली कट्ट्यावर साधेपणाने प्रकाशन

दिवाळीच्या फराळाची लज्जत वाढवणारा महत्वाचा घटक म्हणजे दिवाळी अंक होय. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी 'पुण्यभूषण' या अंकांचे प्रकाशन अतिशय साधेपणाने झाले. 

'पुण्यभूषण' दिवाळी अंकाचे वैशाली कट्ट्यावर साधेपणाने प्रकाशन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : दिवाळीच्या फराळाची लज्जत वाढवणारा महत्वाचा घटक म्हणजे दिवाळी अंक होय. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी 'पुण्यभूषण' या अंकांचे प्रकाशन अतिशय साधेपणाने झाले. पुणे शहराची आगळीवेगळी ओळख सांगणाऱ्या पुण्यभूषण अंकाचे प्रकाशन हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, हा एका शहराला समर्पित असलेला एकमेव दिवाळी अंक मानला जातो. या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे. हॉटेल वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी आणि हॉटेलचा स्टाफ त्याचबरोबर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख, आठवणी हे या वर्षीच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती पुण्यभूषण फाउडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ, सतीश देसाई यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी डॉ. सतीश देसाई म्हणाले, ''दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो. या वर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वैशाली हॉटेल' या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत .यापूर्वी पोस्टमन, सांस्कृतिक विश्वची बातमीदारी हाताळणारे पत्रकार, दगडूशेठ गणेश मंदिर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेलेला आहे.'' 

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ''पुण्यभूषण अंकामुळे पुण्याची विशेष ओळख तयार झाली आहे. या दशकपूर्तिच्या निमित्ताने पुढील वर्षी तयार होणाऱ्या संग्राह्य खंडाच्या निर्मितीसाठी पालिका सहकार्य करेल. पुण्यभूषण दिवाळी अंक व त्यांच्या परंपरेला पालिका भक्कम सहकार्य करेल. पुण्यातील जनजीवन, सण, परंपरा, सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, हीच इच्छा आहे. तसे प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी या शहराची कोविड काळात काळजी घेतली. हे संकट लवकरच जाईल. पुण्याची सांस्कृतिक ओळख जगात पोहोचवू. पुण्यभूषणची सांस्कृतिक चळवळ त्यात उपयोगी ठरत आली आहे.''
जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  

(संपादन : सागर डी. शेलार)