आदिवासी दुर्गम भागातील फलोदे येथे विहीरींचा लोकार्पन कार्यक्रम

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 7 जुलै 2018

मंचर : आदिवासी दुर्गम भागातील फलोदे (ता.आंबेगाव) येथे ग्रामपंचायतचा काही निधी, रोटरी क्लब निगडी यांनी केलेली आर्थिक  मदत व ग्रामस्थांचे श्रमदान यातून पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर बांधण्यात आली आहे. त्यामुळे येथील गावकर्यांचा पिण्याच्या पाण्याचाप्रश्न कायमचा सुटणार आहे.

३२ फुट खोली असून १८ फुट व्यास आहे. या विहिरीसाठी एकूण खर्च पाच लाख ५० हजार रुपये आहे. त्यापैकी गावकऱ्यांचे श्रमदान व ग्रामपंचायतीचा निधी असा एकूण दोन लाख रुपये गावाने खर्च केले. उर्वरित निधी रोटरी क्लब निगडी यांनी उपलब्ध करून दिला. श्रमदानात महिला, मुले व युवकांचा सहभाग होता. चार महिन्यात विहिरीचे काम पूर्ण झाले.

विहीरिचा लोकार्पन कार्यक्रम आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल काळभोर, रोटरी क्लब निगडी चे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांच्या उपस्थित संपन्न झाला. सरपंच मनीषा मेमाणे, माजी सरपंच अशोक पेकारी, दीपक रडे, मनोहर मेमाणे, गणपत मेमाणे, अमोल वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी विहिरीच्या सभोवती दगडांचा भराव करण्याचे काम श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी पाहुण्यांच्या उपस्थित केले. गावकऱ्यांची एकजूट व काम करण्याची पद्धत पाहून पाहुणे भारावून गेले.

“ लोकसहभाग शासन व अशासकिय संस्था, संघटना एकत्रित आल्यास गावविकासाला नक्कीच चालना मिळू शकते. याचे ही विहिर म्हणजे मुर्तिमंत उदाहरण होय. फलोदे ग्रामस्थांचा आदर्श प्रेरणा देणारा आहे.’’ असे काळभोर यांनी सांगितले

Web Title: Publicity program for tribal people in remote areas