आजीबाईंचा भोपळा सापडला, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक!

सुदाम बिडकर
Tuesday, 22 September 2020

अबब तब्बल 31. 5 किलो वजनाचा भलामोठा भोपळा टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथे राजेंद्र बबन हिंगे यांना हा सापडला असून या भोपळ्याला पाहून "आजीबाईच्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टीची " आठवण नक्की येते.

पारगाव (पुणे) : अबब तब्बल 31. 5 किलो वजनाचा भलामोठा भोपळा टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथे राजेंद्र बबन हिंगे यांना हा सापडला असून या भोपळ्याला पाहून "आजीबाईच्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टीची " आठवण नक्की येते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाव्हरेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील मोकळ्या आवारात अनेक झाडे झुडुपे वाढली आहेत. त्यामध्ये काशीफळ भोपळा म्हणजेच डांगर भोपळ्याचा वेलही आहे. ग्रामपंचायत कर्मचारी हिंगे यांनी दिड महीन्यापूर्वी या वेलाला एक भोपळा लागलेला पाहिला होता. त्यांनी ठरवले होते की भोपळा मोठा व पक्व झाल्यानंतर तोडता येईल. पितृपंधरवड्यात नैवद्यासाठी या भोपळ्याची भाजी वापरली जाते. तसेच या भोपळ्याचे पिवळ्या रंगाचे फुलही नैवद्यावर ठेवले जाते. त्यामुळे पितृपंधरवड्यात या भोपळ्याला चांगली मागणी असते. दक्षिण भारतात सांबर मध्ये हा भोपळा वापरला जातो. पावसाळ्यात शेताच्या बांधावर या भोपळ्याचे वेल पाहावयास मिळतात. अलीकडच्या काही वर्षात काहीजण या भोपळ्याची शेती करतात.

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

पितृपंधरवड्यात हिंगे यांनी वेलाला असलेला भोपळा शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सापडला नाही पण त्यांना खात्री होती या वेलाला नक्की एक भोपळा आहे त्यामुळे हिंगे यांनी सतिश पांडुरंग टाव्हरे, बाबाजी अर्जुन टाव्हरे, प्रकाश चिमाजी मधे, पांडुरंग सिताराम टाव्हरे या मित्रांच्या मदतीने भोपळ्याचा शोध सुरु केला अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर भिंत व दगडाच्या आडोशाला हा भलामोठा भोपळा सापडला. त्याचे वजन तब्बल 31.5 किलो भरले ( सरासरी या जातीच्या भोपळ्याचे वजन 15 ते 20 किलो असते) हा भोपळा पाहुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा भला मोठा भोपळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. नंतर भोपळ्याचा शोध घेणाऱ्या या पाचही मित्रांनी या भोपळ्याचे तुकडे करुन वाटून घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pumpkin weighing 31 kg was found in Tawhrewadi