मोबाईलवर अठरा टक्के जीएसटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

सौर उपकरणे, वातानुकूलन यंत्र, फॅक्‍स, प्रिंटरही महागणार
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मोबाईल, सोलर वॉटर हिटर, वातानुकूलन यंत्रे आदी महाग होणार आहेत. किमान दहा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करताना आता अठराशे रुपये कर भरावा लागेल. यापूर्वी याच किमतीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी सहाशे रुपये कर द्यावा लागत होता. 

सौर उपकरणे, वातानुकूलन यंत्र, फॅक्‍स, प्रिंटरही महागणार
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर मोबाईल, सोलर वॉटर हिटर, वातानुकूलन यंत्रे आदी महाग होणार आहेत. किमान दहा हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करताना आता अठराशे रुपये कर भरावा लागेल. यापूर्वी याच किमतीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी सहाशे रुपये कर द्यावा लागत होता. 

जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी ही एकच करपद्धती लागू होणार आहे. या कराचे दर जाहीर झाले आहे. करपद्धतीत प्रथमच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील काही गोष्टींचा समावेश केला गेला आहे. या ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ते करमुक्त ठेवले गेले होते. नवीन कररचनेत अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी लागणारी साधने, सोलर वॉटर हिटर, अणू इंधन, जड पाणी यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रातील वस्तू व उपकरणे महाग होणार आहेत. वीज वितरण कंपन्यांशी केल्या जाणाऱ्या करारावर कर लावला गेल्याचाही परिणाम या क्षेत्रावर पडेल असे चित्र आहे. याबाबत उत्पादक श्रीरंग चांदेकर म्हणाले, ‘‘यामुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या उलाढालीवर परिणाम होऊ शकतो.

मुळातच या ऊर्जेचा वापर कमी होता. परंतु अलीकडील काळात त्याला दिले जाणारे प्रोत्साहन, सबसिडी आणि जनजागृती यामुळे वापर वाढू लागला होता. त्याचा अप्रत्यक्ष फायदा या क्षेत्रातील रोजगार निर्मिती आणि उलाढाल वाढीसाठी झाला होता. आता हे क्षेत्रच जीएसटीमध्ये आले तर त्याचा फटका निश्‍चितच या उद्योगाला बसेल.’’

प्लॅस्टिकच्या उत्पादनावर १८.५ टक्के इतका कर होता. तो आता २८ टक्के केल्याने त्याचेही भाव वधारणार आहेत. गृहोपयोगी वस्तूंमध्ये मोबाईलवर सर्वांत जास्त कर लागू झाला आहे. 

मोबाईलच्या किमतीवर पूर्वी सहा टक्के कर होता. तो आता १८ टक्के इतका असेल. वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर, फर्निचर, प्रिंटर, फोटोकॉपिअर, फॅक्‍स मशिन, व्यायामाची अत्याधुनिक साधने यांच्यावरील कर दोन टक्‍क्‍यांनी वाढला असून, तो २८ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दैनंदिन जीवनात आवश्‍यक अगरबत्ती, प्रिझर्व्हड व्हेजिटेबल, बटर, तूप, जॅम, जेली, रेझर, डिओडरंट, आफ्टरशेव लोशन, शेविंग क्रीम आदीच्या करातही दोन टक्के वाढ झाली आहे.

Web Title: pun news 18% gst on mobile