पुणे : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले; आकडा हजारापार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये 244, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 201, नगरपालिका क्षेत्रात 128 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 19 नवे रुग्ण सापडले आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.21) दिवसभरात 1 हजार 20 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 428 जण आहेत. गेल्या 24 तासांत एकूण 7 हजार 36 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बुधवारी 1 हजार 717 कोरोनामुक्त झाले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती

बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये 244, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 201, नगरपालिका क्षेत्रात 128 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 19 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 23 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 1, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 9 आणि नगरपालिका क्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.20) रात्री 9 वाजल्यापासून बुधवारी (ता.21) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!​

यामुळे पुणे जिल्ह्यातील बुधवार अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 16 हजार 776 झाली आहे. यापैकी 2 लाख 92 हजार 540 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 हजार 559 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 1020 new coronavirus patients found on Wednesday 21 October 2020