पुणे : दहावीत शिकणाऱ्या विराजनं बनवली कोरोनाविषयी इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट

यापूर्वी त्याने कोविड-१९ वॉरबॉट हा रोबोट बनवून तो नायडू, ससून हॉस्पिटलला भेट दिला होता.
बालेवाडी : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विराज शहा या विद्यार्थ्यानं कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे.
बालेवाडी : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विराज शहा या विद्यार्थ्यानं कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे.Sakal Media

बालेवाडी - पुण्यातील दस्तूर शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विराज राहुल शहा या १५ वर्षीय विद्यार्थ्यांने कोरोनाबाबत इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट तयार केली आहे. यासाठी त्याने रितसर प्रशिक्षण घेऊन कोरोनाविषयीची सर्व माहिती जमा करुन ती एका बेसाईटच्या रुपानं समोर आणली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्याच्या या वेबसाईटचं उद्घाटनही पार पडलं. https://www.jeevan-raksha.com, https://www.jeevan-raksha.com/live-donation-portal ही ती वेबसाईट आहे. (Pune 10th standard student has created a website that provides information about Corona)

बालेवाडी : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विराज शहा या विद्यार्थ्यानं कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे.
Corona Update : राज्याला दिलासा; दिवसभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण बरे

'जीवनरक्षा' या नावानं विराजनं वेबसाईट बनवली असून त्यामध्ये कोरोनापासून कोणती काळजी घ्यायची, लसीकरणापासून ते ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थांपर्यंत कुठे काय उपलब्ध आहे? या संदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच प्लाझ्मा दानविषयी माहिती देणाऱ्या लाईफ डोनेशन पोर्टलचीही निर्मिती त्यानं केली आहे. या वेब पोर्टलच्या साहाय्याने लोकांना रक्तदान, प्लाझ्मा दानविषयी माहिती मिळत आहे.

बालेवाडी : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विराज शहा या विद्यार्थ्यानं कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे.
मंचर : मॅट्रिमोनिअल वेबसाईटचा गैरफायदा, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

या वेबसाईटवर जागतीक आरोग्य संघटना (WHO), आयुष मंत्रालय तसेच पुणे महानगरपालिका यांची कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, लसीकरण आणि पुण्यातील लसीकरण केद्रांची यादी, लहान मुलं तसेच वयस्कर लोकांसाठीची मार्गदर्शक तत्त्वं, आयसोलेशन आणि क्वारंनटाइनमधील फरक, पुणे प्लाझ्मा लिंक, कोरोना बाधितांना घरपोच जेवण पोहोचवणाऱ्या, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, पुण्यातील कार्यरत रक्तपेढ्या, ऑक्सिजन संदर्भात कार्य करणाऱ्या संस्था, ऑक्सिमिटर कसं वापरावं, आरोग्य सेतू, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टरांचे सल्ले तसेच मार्गदर्शिका, होमिओपॅथी इ. ची वेगवेगळ्या स्त्रोतांमधून उपलब्ध असणारी महत्त्वाची माहिती तसेच चित्रफीती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

बालेवाडी : पुण्यात दहावीत शिकणाऱ्या विराज शहा या विद्यार्थ्यानं कोरोनाविषयक इत्यंभूत माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे.
खेड-शिवापूर : विनाकारण घराबाहेर फिराल तर थेट कोविड सेंटरमध्ये जालं!

तसेच या वेबसाईटवर कोरोना संदर्भातील रोजचे अपडेट्स देण्यात येणार आहेत. सर्व माहिती एकाच पोर्टलवर पहाता येणार आहे. पुणे कोविड वेबसाईट, पुणे प्लास्मा वेबसाईट लिंक, पीएमसी होम आसोलेशन अँप्लिकेशन लिंक, शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी उपलब्ध माहिती, अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपीएलची उपलब्ध बससेवा याची माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना गरजेची असणारी गोष्ट म्हणजे प्लाझ्मा आणि रक्तदान या दोन्ही गोष्टींसाठी ऑनलाइन आणि लाईव्ह पोर्टल बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे भारतभरातून कोणताही व्यक्ती ज्याला प्लाझ्मा किंवा रक्तदान करायचं आहे, ती व्यक्ती या वेबसाईटवर स्वतःला रजिस्टर करू शकते, प्लाझ्मा दिल्यानंतर ती व्यक्ती स्वतः ची माहिती या पोर्टलवरून कमी करू शकते. या ऑनलाइन पोर्टलवरून गरजू लोक भारतातून कुठूनही, रक्तदाते किंवा प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तींना शोधून एकमेकांशी संपर्क करू शकतात. विराजने गेल्यावर्षी सुद्धा, कोविड-१९ वॉरबॉट नामक सेमीऑटोमॅटिक रोबोट बनवून पुण्याच्या नायडू आणि ससून हॉस्पिटलला कोविडविरोधी लढ्यासाठी दिला आहे.

आपल्या या उपक्रमाबाबत बोलताना विराज सांगतो, "देशातील कोविड संदर्भातील परिस्थिती पहाता सर्वसामान्य व्यक्तीला कोरोनाशी लढा देण्यासाठीची सर्व माहिती एकत्रित मिळावी. तसेच लहान कुटुंबांना स्वतःची काळजी घेण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे सहज उपलब्ध व्हावीत या उद्देशाने मी ही वेबसाइट बनवली आहे. यासाठी माझे वडील राहुल शहा आणि आई अंकिता शहा यांचे मार्गदर्शन आणि पाठींबा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com